रविवारी आयोजित रन फॉर स्कीलमॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात बदल

लातूर, दि. 15 (जिमाका) : राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाचे  मंगल प्रभात  लोढा यांच्या आदेशानुसार लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 17 सप्टेंबर 2023 रोजी रन फॉर स्कीलमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनच्या मार्गात बदल झाला असून ही मॅरेथॉन आता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक या मार्गावर होईल, अशी माहिती लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून सकाळी 7 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ते राजीव गांधी चौक आणि पुन्हा राजीव गांधी चौक ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था दरम्यान ही मॅरेथॉन होईल. यामध्ये सुमारे 400 प्रशिक्षणार्थी सहभागी होतील. तसेच सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुपये 3 हजार, द्वितीय क्रमांक 2 हजार व तृतीय क्रमांक 1 हजार असे अनुक्रमे पुरुष व महिला स्वतंत्रपणे देण्यात येतील, असे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविल आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु