लामजना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा माहितीपट
लामजना येथील जिल्हा
परिषद शाळेतील
विद्यार्थ्यांनी पाहिला
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा माहितीपट
लातूर, दि. 12 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील महसूल मंडळांच्या गावांमध्ये चित्ररथाद्वारे मुक्तिसंग्रामाचा जागर होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या ‘क्रांतिशाली लातूर’ हा चित्ररथ आज लामजना येथील जिल्हा परिषद शाळेत पोहचला. याठिकाणी मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यावर आधारित माहितीपट पहिला. यावेळी गावातील नागरिकही
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत मुक्तिसंग्रामावर आधारित चित्ररथाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्ररथ जिल्ह्यातील महसूल मंडळांच्या गावांमध्ये जाणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढ्यावर आधारित चित्रफित ह्या चित्ररथाद्वारे दाखविण्यात येत आहे.
****
Comments
Post a Comment