क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. 16 (जिमाका) : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 17 सप्टेंबर, 2023 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8.46 वाजता लातूर येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे आगमन होईल. याठिकाणी त्यांच्या उपस्थितीत सकाळी 8.47 वाजता हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण व सलामी. सकाळी 9 वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण व राष्ट्रध्वजवंदन, राष्ट्रगीत वादन होईल. सकाळी 9.03 वाजता सर्व उपस्थितांना शपथ कार्यक्रम. सकाळी 9.06 वाजता संबोधन, सकाळी 9.10 वाजता पुरस्कार वितरण होईल. सकाळी 9.15 वाजता स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सोहळा होईल. सकाळी 9.20 वाजता दुर्मीळ ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथून मोटारीने शकुंतला निवासस्थानाकडे प्रयाण करतील व राखीव. सकाळी 11.30 वाजता मोटारीने बाभळगाव रोडवरील ओम हामणे पॅराडाईजकडे प्रयाण करतील. याठिकाणी महेश कुमार बालवाड (रेड्डी) यांच्या मुलीच्या कुंकूम तिलक (साखरपुडा) कार्यक्रमास उपस्थित राहतील.
ना. बनसोडे हे दुपारी 12 वाजता लातूर येथून मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता उदगीर येथील जानापूर रोडवरील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे त्यांचे आगमन होईल. याठिकाणी रमेश मन्मथप्पा कंटे यांच्या मुलाच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.25 वाजता उदगीर येथील नांदेड रोडवरील शिवनंदा फंक्शन हॉल येथे बबन ज्ञानोबा कांबळे यांच्या मुलाच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.40 वाजता उदय पेट्रोलपंपाच्या पाठीमागील महादेव मंदिर येथे सदिच्छा भेट देतील. दुपारी 2.30 वाजता डॅम रोड येथे दिवंगत हिराबाई वसंतराव भोसले यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 3 वाजता संतोषी माता नगर सिंग्नल नं. 2 येथे दिवंगत सुशीलबाई सिध्दरामप्पा मिंचे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. तसेच दुपारी 4 वाजता उदगीर तालुक्यातील चौडी येथील दिवंगत विकास कचरु कांबळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी 5.30 वाजता उदगीर शहरातील जळकोट रोडवरील ग्रँड फंक्शन हॉल येथे याकुबसाब शेख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. त्यानंतर सोईनुसार उदगीर येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील व शकुंतला निवासस्थान येथे राखीव.
*****
Comments
Post a Comment