‘मुख्यमंत्री शाश्व सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन

                                       ‘मुख्यमंत्री शाश्व सिंचन योजनेंतर्गत

वैयक्तिक शेततळे योजनेसाठीअर्ज करण्याचे आवाहन

 

*लातूर, दि.5 (जिमाका):* मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना नोव्हेंबर 2022 पासून राज्यात कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेतून आतापर्यंत 40 शेततळे पूर्ण झाले असून सध्याच्या मोठ्या पावसाच्या खंड काळात शेततळ्यामध्ये जमा झालेल्या पाण्याचा खरीप पिके तसेच फळबागाच्या संरक्षित सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. 

सध्याची टंचाईची परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहीर व बोअरवेलचे तसेच परतीच्यापावसाद्वारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेऊन वाचविणे गरजेचे आहे. या योजनेतून अस्तरीकरणाशिवाय शेततळ्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत व अस्तरीकरणासह शेततळ्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयेपर्यंत अनुदान मिळते.  काम पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यात येते.

यापूर्वी शेततळ्याचा लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील फळबागधारक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर सीएससी (CSC) केंद्रामार्फत किंवा वैयक्तिकरित्या ऑनलाईन नोंद करून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु