‘आयुष्मान भवः’ मोहिमेत गावे क्षयमुक्त करावीत - अनमोल सागर
‘आयुष्मान भवः’ मोहिमेत गावे
क्षयमुक्त करावीत
-
अनमोल सागर
लातूर, दि. 13 (जिमाका): देशात 13 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत ‘आयुष्मान भवः’ मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत गावे क्षयमुक्त करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले. भातांगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘आयुष्मान भवः’ मोहिमेच्या जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बेरुरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. तांबारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
समाजातील सर्व घटकांनी ‘आयुष्मान भवः’
मोहिमेत सहभागी होवून आरोग्यदायी जीवनाची सुरुवात करावी. सर्व गावांनी यात सहभागी
होवून गावे क्षयरोगसारख्या आजारातून मुक्त करणेचे आवाहन श्री. सागर यांनी केले.
अवयवदानाची चळवळ व्यापक करणे आवश्यक असून जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. तसेच ‘आयुष्मान भवः’ मोहिमेमुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होणार असून वेळेत सर्व आजाराचे निदान झाले तर समाज सुदृढ होण्यास मदत होईल, असे मत आरोग्य विभागाच्या उपसंचालक श्रीमती डॉ. भोसले यांनी व्यक्त केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी कर्करोगाबाबत मार्गदर्शन
केले. सध्या कर्करोग व असंसर्गीक आजार वाढत असून त्यावर मात करण्यासाठी लवकर निदान
व उपचार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड वितरण करण्यात आले. तसेच अवयवदान, क्षयरोग निदान, असंसर्गीक आजाराबाबत विविध जाणीव जागृती स्टॉलचे व तपासणी शिबीराचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. आयुष्यमान कार्ड पाच लाभार्थी, क्षयरोग रुग्णांना मोफत आहाराची मदत करणारे पाच निक्षय मित्र, क्षयरोग मात करणारे चॅम्पीयन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी
केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी केले.
*****
Comments
Post a Comment