‘सेवा महिना’ अंतर्गत 21 सप्टेंबर रोजी औसा येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

                                            ‘सेवा महिना’ अंतर्गत 21 सप्टेंबर रोजी

औसा येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

लातूर, दि. 21 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्र आणि औसा येथील एन.बी.एस. पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा महिना’ अंतर्गत 21 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. औसा येथील एन.बी.एस. पॉलिटेक्निक इंस्टिट्यूटमध्ये होणाऱ्या या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 10 आस्थापनांनी 247 पदे अधिसूचित केली असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी कळविले आहे.

रोजगार मेळाव्यात पुणे येथील टॅलेंट सेतू सर्व्हिसेस प्रा.लि. आणि एचआर मॅनेजमेंट सोल्युशन प्रा. लि., मुंबई येथील नीट लि., लातूर येथील जस्ट डाईल लि, आयआयएफएल समस्ता फायनान्स, क्रेडीट ऍक्सेस ग्रामीण लि., देवराज ट्रेनिंग आणि रिक्रूटिंग, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (औसा शाखा), ऑथेंटिक गार्डस इंडिया प्रा. लि. आणि द्वारकादास शामकुमार आदी आस्थापनांनी पदे अधिसूचित केली आहेत. या नामांकीत कंपन्यांमध्ये इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी 27 सप्टेंबर2023 रोजी सकाळी 10 वाजता औसा येथील एन.बी.एस. पॉलिटेक्निक इंस्टिट्यूट येथे आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो (पाच) सोबत आणावेत. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकतामार्गदर्शन केंद्रलातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मरे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु