सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती नियुक्तीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मुलाखती
सामाजिक अंकेक्षण साधन व्यक्ती नियुक्तीसाठी 5 ऑक्टोबर रोजी मुलाखती
लातूर, दि. 28 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाअंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी विहीत पात्रता धारण इच्छुक उमेदवारांकडून १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते. या पदाच्या मुलाखती 5 ऑक्टोबर, 2023 रोजी होणार आहेत.
अर्जाच्या छाननी अंती वैध उमेदवार यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या latur.gov.in या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील वैध उमेदवार यांनी ०५ ऑक्टोबर, 2023 रोजी अनुक्रमांक ०१ ते १५० सकाळी १० वाजता व अनुक्रमांक १५१ ते ३४२ उमेदवार यांनी दुपारी ३ वाजता मुळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, (शाखा - रोहयो) दुसरा मजला हॉल क्रमांक २०७ बार्शी रोड, लातूर येथे अर्धा तास अगोदर उपस्थित राहावे, असे लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) आणि उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment