अहमदपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर होणार शिल्प निदेशाकाची नेमणूक

 

अहमदपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

तासिका तत्वावर होणार शिल्प निदेशाकाची नेमणूक

·       15 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर, दि. 01 (जिमाका): अहमदपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकाची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले अर्ज स्वतः अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात सादर करण्याचे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे

तारतंत्री (वायरमन) तुकडी संख्या 1 आणि इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक तुकडी संख्या 1 यासाठी निदेशाकाची नेमणूक करण्यात येणार आहे. अभियंता पदवी, एक वर्ष अनुभव किंवा अभियांत्रिकी पदविका आणि दोन वर्षे अनुभव आवश्यक आहे. तसेच आयटीआय आणि सीआयटीएस (सीटीआय) मधील दोन वर्षाचा अथवा आयटीआय आणि अप्रेंटशिपचा तीन वर्षाचा अनुभव या पदांसाठी आवश्यक आहे.

संबंधित व्यवसायाच्या शिक्षकीय पदाची पात्रता संबंधित व्यावसायाच्या शाखेप्रमाणे राहील. तसेच संबंधित क्षेत्रातील पदांच्याच अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. या पदांसाठी 15 नोव्हेंबर, 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार तासिका मानधन देण्यात येईल. 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा