लातूर जिल्ह्यात आक्षेपार्ह गाणी वाजविण्यास मनाई
लातूर, दि. 26 (जिमाका) : लातूर जिल्ह्यात ‘हर टोपीवाला भी सर झुकाके जय श्रीराम बोलेगा’ ‘मंदिर वही बनायेंगे’, ‘तेरे मक्का और गदिना में शिव का डंका बजता है’, ‘दूर हटाओ अल्ला वालो’ सारखी आक्षेपार्ह गाणी किंवा इतर आक्षेपार्ह गाणी सार्वजनिक ठिकाणी वाजविणे, त्या गाण्याची सीडी, कॅसेट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे व ताब्यात ठेवणाऱ्यावर गणपती उत्सव दरम्यानच्या कालावधीमध्ये बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
धार्मीक व सामाजिक शांततेला बाधित करणारे कोणतेही कृत्य करण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे. संपुर्ण जिल्हाभर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ची अधिसूचना लागू करण्यात आली. हे आदेश 23 सप्टेंबर, 2023 से 00.01 वाजता पासून ते 28 सप्टेंबर,2023 चे या 24.00 वाजेपर्यंत लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले .
*****
Comments
Post a Comment