‘माविम’मार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात 110 महिला मतदारांची नोंदणी
‘माविम’मार्फत आयोजित
प्रशिक्षण कार्यक्रमात
110 महिला मतदारांची
नोंदणी
लातूर,
दि. 8 (जिमाका):
मुख्य
निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला
आहे. या अंतर्गत पात्र नागरिकांच्या नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत
आहे. या अंतर्गत लातूर येथे 5 सप्टेंबर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने
आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मतदार नोंदणी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये 110 पात्र महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली.
या कॅम्पमध्ये उपस्थित सर्व पात्र महिलांचे मतदार नोंदणी अर्ज
भरुन घेण्यात आले. तसेच ज्या महिला मतदारांच्या मतदार यादीतील तपशिलामध्ये काही
दुरुस्ती करावयाची होती. त्यांचे नमुना क्र.8 मधील अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उपस्थित महिलांना मतदार नोंदणी आणि मतदानाचा
अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.
*****
Comments
Post a Comment