‘मिलेट रॅली’मधून सांगितले पौष्टिक तृणधान्यांचे महत्व

 

 ‘मिलेट रॅली’मधून सांगितले पौष्टिक तृणधान्यांचे महत्व

·        मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त कृषि विभागाचा उपक्रम


लातूर
, दि. 16 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्षानिमित्त कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून तृणधान्याचे महत्व पटवून देण्यात आले. जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवसांब लाडके यांच्या हस्ते या रॅलीचे उद्घाटन झाले.

कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप जाधव, राजेंद्र काळे, तालुका कृषि अधिकारी दिलीप राऊत, संजय गायकवाड, लक्ष्मण खताळ, नितीन कांबळे, संजय नाब्दे, संजयकुमार ढाकणे, अनिल शेळके यावेळी उपस्थित होते.


मानवी आरोग्यासाठी बाजरी, राळा, नाचणी, राजगिरा, ज्वारी या तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे प्रत्येक आठवड्यातून किमान एकदा तरी या तृणधान्यांचे सेवन करावे, असे आवाहन श्री. लाडके यांनी यावेळी केले.

जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरु झालेली रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे महात्मा गांधी चौक येथून परत जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ विविध तृणधान्यांचे महत्त्व पटवून देण्यारी रांगोळी साकारण्यात आलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शहरातील सदानंद विद्यालय व केशवराज विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जिल्ह्यातील कृषि व संलग्न विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले, कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु