मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह संस्थेत दिव्यांगासाठी मोफत संगणकीय आणि व्यावसाईक प्रशिक्षणाची संधी
मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह संस्थेत
दिव्यांगासाठी मोफत संगणकीय आणि व्यावसाईक प्रशिक्षणाची संधी
लातूर, दि.6 (जिमाका): शासनाचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि सांगली जिल्हा परिषद अंतर्गत कायर्रत मिरज येथील शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी शासकीय संस्था आहे.
या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाची मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील एफआयसीसीआय अवार्ड 1999 प्राप्त झाला आहे. या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. मोजक्याच जागा असल्याने ग्रामीण व शहरी भागातील गरजू दिव्यांग यांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे.
दिव्यांगासाठी प्रशिक्षण कालावधी व वयोमर्यादा
सर्टिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) यासाठी शैक्षणिक पात्रता आठवी पास तर मोटार अॅन्ड आर्मेचर वायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स) साठी किमान नववी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 16 वर्षे ते 40 वर्षे वयोमर्यादेतील दिव्यांगांना प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षण कालावधी एका वर्षाचा राहील.
प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना या सोई व सवलती दिव्यांगाना प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणार आहेत.
अर्ज केंव्हा, कसे व कोठे करावा
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रोढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि.सांगली पिन कोड:- 416410 येथे समक्ष मोफत मिळतील. अधिक माहितीसाठी 0233-2222908 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9922577561 किंवा 9595667936 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत.
प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशिट व प्रमाणपत्र, दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल, असे शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाचे अधीक्षक यांनी कळविले आहे.
******
Comments
Post a Comment