बोकनगाव येथे पशुपालन व दुग्ध व्यवसाय शिबीर उत्साहात
बोकनगाव येथे
पशुपालन व दुग्ध व्यवसाय शिबीर उत्साहात
लातूर, दि. 18 (जिमाका): मराठवाडा
मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त मुरुड येथील कुक्कुट प्रशिक्षण केंद्र व
लातूर रोटरी क्लब मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने बोकनगाव येथे पशुपालन व दुग्ध
व्यवसायाविषयी सात दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात करण्यात आले. या
कार्यक्रमाचे उद्घाटन माफसूचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाणे यांनी केले.
परभणी पशूवैद्यकीय
महाविद्यालय प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडे यांनी प्रजनन व गोठा नियोजन याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिरात डॉ. बुकशेटवार, डॉ. गणेश निटुरे, डॉ. दरगेश
गोलहेर, डॉ. बालाजी देवकते, डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. किरण दंडे, डॉ. गुणवंत
बिराजदार, डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसाय यातील विविध
विषयावर मार्गदर्शन केले.
या सात दिवसीय
प्रशिक्षण समारोप प्रसंगी डॉ. योगेशसिंह बायस यांनी तरुणांनी दुग्ध व्यवसाय हा
मुख्य व्यवसाय म्हणून स्विकारावा व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन एस.डी. कोळेकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी सरपंच सुरेखाताई स्वामी , उपसरपंच किशोर दाताळ, बंडू शिंदे, पंडित
दाताळ, सुरेश शिंदे, बळवंत किरेकर यांच्यासह गावातील व परिसरातील नवतरुणांनी प्रयत्न
केले . या कार्यक्रमात 255 प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डॉ. राजकुमार पडिले यांनी केले.
****
Comments
Post a Comment