‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेत सहभागी होण्यास मुदतवाढ · मतदार नोंदणीविषयी जनजागृतीसाठी आयोजन

 

‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेत सहभागी होण्यास मुदतवाढ

·        मतदार नोंदणीविषयी जनजागृतीसाठी आयोजन

लातूर, दि. 26  (जिमाका) : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित ‘अभिव्यक्ती मताची’ (व्हॉइस ऑफ वोट) या संकल्पनेवर आधारित जाहिरात निर्मिती, पोस्टर आणि घोषवाक्य या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 जिल्ह्यातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या (मास मीडिया व जर्नलिजम) महाविदयालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय (आर्ट कॉलेजस) मधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु