टपाल विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमासाठी थेट अभिकर्ता नेमणूकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मुलाखती
टपाल विमा आणि
ग्रामीण टपाल जीवन विमासाठी
थेट अभिकर्ता
नेमणूकीसाठी 25 सप्टेंबर रोजी मुलाखती
लातूर, दि. 18 (जिमाका): भारतीय
डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेतंर्गत लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा अंतर्गत
टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमासाठी थेट अभिकर्ता (डायरेक्ट एजेंट) यांची
नेमणूक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. इच्छकू उमेदवारांनी लातूर येथील डाकघर
अधीक्षक कार्यालय मुख्य डाकघर इमारत, दुसरा मजला, येथे सोमवार 25 सप्टेंबर, 2023
रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित
राहावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.
उमेदवाराचे वय मुलाखतीच्या
दिवशी 18 वर्षापेक्षा कमी व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवार किमान दहावी
उत्तीर्ण असावा. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झालेल्या
उमेदवारास 5 हजार
रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव ठेवावी लागेल. ही ठेव एनएससी अथवा केव्हीपीच्य
स्वरुपात राहील. तसेच परीक्षा शुल्क 400 रुपये व परवाना शुल्क 50 रुपये जमा करावे
लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपाचा परवाना
देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये
रुपांतरित केला जाईल. मुलाखतीस येतांना सोबत विहीत नमुन्यातील अर्ज आणि सर्व
शैक्षणिक कागदपत्रासह आधारकार्ड, पॅनकार्ड, 03 पासपोर्ट आकाराचे फोटो व अन्य
झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात असे आवाहन धाराशिव विभाग लातूर मुख्यालयाचे डाकघर
अधीक्षक यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment