लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील दोन अभियंते, एका कर्मचाऱ्याला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर · 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार वितरण
लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळातील दोन अभियंते,
एका कर्मचाऱ्याला राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर
· 15 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार वितरण
लातूर, दि. 13 (जिमाका): भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी ‘अभियंता दिन’ म्हणून राज्य शासनातर्फे साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंता व कर्मचारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो. सन 2022-23 मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल लातूर सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन अभियंते आणि एका कर्मचाऱ्याची या पुरस्कारासाठी निवड झाली असून 15 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होईल.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागातील उपकार्यकारी अभियंता सुनील गोविंदराज बिराजदार आणि लातूर सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता लोभाजी आयलुजी घटमल यांचा समावेश आहे. तसेच लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कनिष्ठ लिपिक गजानन शिवाजीराव चव्हाण यांनाही पुरस्काराने गौरविण्यात अयेणार आहे.
******
Comments
Post a Comment