क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन
लातूर,
दि. 15 (जिमाका) :
मराठवाडा मुक्तिसंग्राम
दिनानिमित्त रविवारी, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता लातूर
येथील हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन होणार आहे.
सकाळी 8.50 वाजता मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात
येईल व मानवंदना देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले
आहे.
Comments
Post a Comment