मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते 101 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र प्रदान

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम  

ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते  101 लाभार्थ्यांना मंजूरीपत्र प्रदान

 

लातूर, दि. 18 (जिमाका):  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रम चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेने 3 कोटी 1 लाख 15 हजार रुपये कर्ज रक्कमेचे 126 प्रस्ताव मंजूर केली आहे. त्यापैकी 101 लाभार्थींना कर्ज रक्कम 2 कोटी 50 लाख 22 हजार रक्कमेचे मंजूरी पत्र 17 सप्टेंबर, 2023 रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहन कार्यक्रमानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री  संजय बनसोडे यांचे हस्ते वाटप करण्यात आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यावेळी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक गोपाळ पवार यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती /महिलांना रोजगार पुरविणेसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये उत्पादन व सेवा उद्योगासाठी बँकेमार्फत कर्ज व शासनाकडून 35 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.

सन 2023-2024 साठी लातूर जिल्ह्यासाठी 760 कर्ज प्रकरणे मंजूरीचे उदिष्ट आहे. आतापर्यंत बँकांनी 301 कर्जप्रस्ताव मंजूर केले आहेत. कर्जप्रस्ताव तयार करणे व मंजूरीसाठी उमेद, माविम यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमासाठी स्टेट बँक ऑफ इंडीयाचे विभागीय प्रबंधक प्रविण मांडेकर, आरसीसीचे मुख्य प्रबंधक श्री. नागाबाबू, आरबीओचे उपप्रबंधक मनोजकुमार सुर्यवंशी, आरसीसी एसबीआयचे प्रबंधक अमोल रेवडकर हे उपस्थित होते.  

****  

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा