लातूर-कळंब मार्गावरील लातूर आगाराच्या बसफेऱ्या सुरळीत सुरु
लातूर-कळंब मार्गावरील लातूर आगाराच्या
बसफेऱ्या सुरळीत सुरु
लातूर, दि. 01 (जिमाका): एसटी बसच्या
लातूर-कळंब महामार्गावरील फेऱ्यांचे नियोजन कोलमडल्याची बातमी काही
वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र या मार्गावरील लातूर आगाराच्या एकाही
बसची फेरी रद्द करण्यात आली नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी दिली आहे.
लातूर-कळंब मार्गावर 5
बसद्वारे जाणाऱ्या 15 आणि येणाऱ्या 15 फेऱ्या अशा रोज 30 फेऱ्या करण्यात येत आहेत.
21 ऑगस्ट 2023 पासून दहा दिवसांची तपासणी केली असता या मार्गावर दररोज 30 फेऱ्या
चाविण्यात आल्या आहेत. लातूर आगाराची एकही फेरी रद्द करण्यात आलेली नाही. प्रवाशी
वाहतुकीसाठी नियत फेऱ्या वेळेवर मार्गस्थ व्हाव्यात, बसेस
बिघाड होवून प्रवाशांची गैरसोय होवू नये, फेऱ्या समांतर
धावणार नाहीत, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाकडून दक्षता घेण्यात येत असल्याचे विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीस
दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*****
Comments
Post a Comment