क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा दौरा
लातूर, दि. 8 (जिमाका): राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे 9 सप्टेंबर, 2023 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे हे सकाळी साडेनऊ वाजता लातूर येथून जळकोटकडे प्रयाण करतील. सकाळी अकरा वाजता जळकोट येथील जळकोट- कुनाकी रोडवरील तिरुमला मंगल कार्यालयात आयोजित महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, लातूर अंतर्गत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कामाच्या (कुणकी – जळकोट - हळदवाढवणा-रावणकोळा रस्ता) भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
दुपारी साडेतीन वाजता उदगीर येथील देगलूर रोडवरील राधेकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित पदवीदान व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास ना. बनसोडे उपस्थित राहतील. सायंकाळी साडेपाच वाजता उदगीर येथील श्यामलाल मैदान येथे श्यामलाल विज्ञान, कला व क्रीडा अकादमीतर्फे आयोजित सांस्कृतिक महानाट्य ‘बखर हौतात्म्याची’ च्या उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार लातूरकडे प्रयाण करतील.
रविवार, 10 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता लातूर येथून मोटारीने पंढरपूर (जि. सोलापूर)कडे प्रयाण करतील.
******
Comments
Post a Comment