हुतात्मा स्मारक परिसरात मराठवाडा मुक्तिलढ्याचे
दुर्मिळ छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शन
·
ज्येष्ठ
स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांच्या हस्ते झाले झाले
·
प्रदर्शन
17 सप्टेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले
लातूर, दि. 15 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे लातूरकरांना मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास सचित्र स्वरुपात समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सकाळी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुक्तिसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जीवनधर शहरकर यांच्या हस्ते आज झाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, माजी
सनदी अधिकारी तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत
देशमुख, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार गणेश सरोदे, इतिहास अभ्यासक डॉ.
सुनील पुरी, भाऊसाहेब उमाटे यांची यावेळी प्रमुख उपस्थित होते.
ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात 225 पेक्षा अधिक मौल्यवान आणि दुर्मिळ ग्रंथ, मुक्तिसंग्रामातील विविध घटना, प्रसंगांची दुर्मिळ छायाचित्रे, तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये मुक्तिसंग्रामाविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, अग्रलेख, भाषण, शासकीय पत्रव्यवहार व आदेश, मुक्तिसंग्रामावर आधारित शोध प्रबंध आदी महात्पूर्ण दस्तावेज पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रदर्शनातील ग्रंथ व दुर्मिळ वृत्तपत्र याचे संकलन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. सुनील पुरी आणि भाऊसाहेब उमाटे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देवून मराठवाडा मुक्तिसंग्राचा इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*****
Comments
Post a Comment