मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘शोर्यागाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त आयोजित
‘शोर्यागाथा मराठवाडा
मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमालेचा शुक्रवारी समारोप
·
ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा, माजी सनदी अधिकारी
लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थितीत
लातूर, दि. 14 (जिमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा
पुढील पिढीला समजावी, यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा
माहिती कार्यालय व बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही
व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
या व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 रोजी
सायंकाळी साडेचार वाजता हुतात्मा स्मारक येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा असतील, तर माजी सनदी अधिकारी तथा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख
वक्ते असतील.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सनदी अधिकारी कौस्तुभ
दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, बाबासाहेब
परांजपे फाऊंडेशन अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष ऍड. मनोहरराव गोमारे, दयानंद
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,
उद्योजक शिवशंकर लातुरे, सनदी लेखापाल महेश मालपाणी यांची यावेळी उपस्थिती राहणार
आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याविषयी माहिती शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळावी, यासाठी ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमाला
आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ
महाविद्यालयांमध्ये 75 व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा
समारोप माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
तसेच या व्याख्यानमालेतील वक्ते, समन्वयक यांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार
असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.
*****
Comments
Post a Comment