जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद; 25 सप्टेंबरला उदगीर नगरपरिषद हद्दीतील मद्यविक्री बंद
जिल्ह्यात 19 सप्टेंबर रोजी मद्यविक्री बंद;
25 सप्टेंबरला उदगीर नगरपरिषद हद्दीतील मद्यविक्री बंद
लातूर, दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात 19 सप्टेंबर, 2023 ते 28 सप्टेंबर,
2023 या कालावधीत गणेशोत्सव हा सण साजरा होत आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था
अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी 19 सप्टेंबर, 2023 रोजी
संपूर्ण लातूर जिल्ह्यातील, तसेच 25 सप्टेंबर, 2023 रोजी उदगीर नगर परिषद हद्दीतील
सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद
ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी
करण्यास कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व
अनषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी
निर्गमित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
*****
Comments
Post a Comment