आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आज मिलेट दौडचे आयोजन · जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य वर्षानिमित्त
आज मिलेट दौडचे आयोजन
·
जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे
आवाहन
लातूर, दि. 15 (जिमाका): सन 2023
हे
वर्ष आतंरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.
यानिमित्त कृषि विभाग संलंग्न विभागांच्या समन्वयाने शनिवारी (दि. 16) सकाळी
साडेसात वाजता मिलेट दौडचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी
या दौडमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही.
लाडके यांनी केले आहे.
जुने जिल्हाधिकारी
कार्यालय परिसरातून शनिवारी सकाळी साडेसात वाजता मिलेट दौड सुरु होईल. अशोका हॉटेलमार्गे
महात्मा गांधी चौक आणि गांधी चौक येथून पुन्हा जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात
आल्यानंतर दौडचा समारोप होणार असल्याची माहिती श्री. लाडके यांनी दिली.
*****
Comments
Post a Comment