हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा होता - विवेक सौताडेकर

                              मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा होता

 विवेक सौताडेकर


लातूर
दि.6 (जिमाका): आपला भारत देशाचा बहुतांश भाग हा ब्रिटिश राज्यकर्त्यांपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. परंतु भौगोलिक दृष्टीने भारताच्या मध्यभागी असलेले हैदराबाद हे मोठे संस्थान मात्र अद्याप भारतात विलीन झाले नव्हते. यासाठी  भारतीय स्वातंत्र्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवस  येथील लोकांनी निकराचा लढा दिला. त्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आणि भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. त्यामुळे हैदराबादचा स्वातंत्र्यलढा हा प्रादेशिक लढा नसून भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा होता, असे प्रतिपादन इतिहास संशोधक विवेक सौताडेकर यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागजिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ या व्याख्यानमाले अंतर्गत गंगापूर येथील जय किसान विद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानात श्री. सौताडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी  विद्यालयाचे प्राचार्य अशोक बिराजदार होते. व्याख्यानमालेचे तालुका समन्वय दीपक कानगुलेपर्यवेक्षक श्री. कोळी आदी यावेळी उपस्थित होते.     

     श्री. सौताडेकर पुढे म्हणाले कीहैदराबाद मुक्ती लढ्याचा इतिहास अत्यंत गौरवशाली व दैदिप्यमान आहे. हा मुक्ती लढा म्हणजे जुलमी प्रशासकाच्या विरोधात येथील स्थानिक जनतेने लढलेला लढा असून आजच्या पिढीला समजणे अत्यंत गरजेचे आहे.  त्यामुळे या लढ्याचा समावेश शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात स्वतंत्ररित्या झाला पाहिजे. यासाठी विद्यार्थीशिक्षक आणि स्थानिक व प्रशासनाने पुढे येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोप अशोक बिराजदार यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  दिपक कानगुले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. लक्षट्टे यांनी केले. व्याख्यानास शिक्षकशिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा