प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेची प्रकरणे केंद्रिय सैनिक बोर्डाकडे ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन

                                                प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेची प्रकरणे

केंद्रिय सैनिक बोर्डाकडे ऑनलाईन पाठविण्याचे आवाहन

लातूर, दि. 5 (जिमाका):  शैक्षणिक वर्ष सन 2023-24 करिता प्रधानमंत्री शिष्यवृत्ती मिळण्यासाठीची प्रकरणे www.ksb.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करण्याची कार्यवाही सुरु झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर,2023 आहे या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांच्या पात्र पाल्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

इयत्ता बारावी किंवा पदविका (डिप्लोमा) मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम किंवा द्वितीय वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाला (कोर्सेसची यादी ऑनलाईन पहावी) प्रवेश घेतलेल्या माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यास, मुलीला 36 हजार रुपये आणि मुलाला 30 हजार रुपये वर्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु