जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते ‘शासकीय योजना पुस्तिका’चे प्रकाशन

                                             जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते

‘शासकीय योजना पुस्तिका’चे प्रकाशन

·        मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम

·        लातूर जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती


लातूर
दि. 8 (जिमाका):  मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ‘शासकीय योजना पुस्तिका’ तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत झाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी, त्यांना संबंधित योजनेचे निकष, या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आदी अनुषंगिक बाबींची माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध व्हावी, यासाठी लातूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त निधीतून ‘शासकीय योजना पुस्तिका’ तयार करण्यात आली आहे.

‘शासकीय योजना पुस्तिका’ ही अतिशय माहितीपूर्ण असून यामध्ये शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, असे जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांनी पुस्तिका प्रकाशन कार्यक्रमात सांगितले.

******

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा