हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या रिटेल, आऊटलेट डीलरशिपसाठी संरक्षण श्रेणीतील इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनच्या रिटेल, आऊटलेट डीलरशिपसाठी संरक्षण श्रेणीतील इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 8 (जिमाका) : हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. द्वारा रिटेल, आऊटलेट डीलरशिपसाठी जाहिरात प्रसिध्दी झाली आहे. तरी संरक्षण श्रेणीतील इच्छुक उमेदवारांनी 14  सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

जिल्ह्याचे ठिकाण श्रेणी इत्यादी असलेल्या जाहिरातीची प्रत आणि अर्जाचा नमुना आणि इतर संबंधित सविस्तर तपशिल असलेले माहिती पत्रक www.petrolpumpdealerchayan.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तरी संरक्षण श्रेणीतील पात्र उमेदवारांनी सीसी -1 या श्रेणीमधून 14 सप्टेंबर, 2023 पर्यंत जास्तीत जास्त अर्ज करु शकतील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल श्री. पांढरे यांनी कळविले आहे.

******

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु