‘रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे लातूर येथे 17 सप्टेंबर रोजी आयोजन

                                                   ‘रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे

लातूर येथे 17 सप्टेंबर रोजी आयोजन

लातूर, दि. 4 (जिमाका): राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाचे  मंगल प्रभात  लोढा यांच्या आदेशानुसार लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 17 सप्टेंबर 2023 रोजी ‘रन फॉर स्कील’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 7 वाजता मॅरेथॉनला सुरुवात होईल. वेळे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंजगोलाई आणि गंजगोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान ही मॅरेथॉन होईल. यामध्ये सुमारे 400 प्रशिक्षणार्थी सहभागी होतीलअसे लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविल आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा