विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा 29 व 30 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा

 

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

यांचा 29 व 30 सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा दौरा

 

          लातूर, दि. 27 (जिमाका) :   विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ह्या शनिवार, 29 व 30 सप्टेंबर, 2023 रोजी दोन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे शुक्रवार, 29 सप्टेंबर, 2023 रोजी रात्री 8. 30 वाजता लातूर येथे आगमन होईल. 

विधानपरिषद उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे ह्या शनिवार, 30 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता लातूर येथून किल्लारीकडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वाजता त्यांचे किल्लारी येथे आगमन होईल. किल्लारी येथील भूकंपात मृत झालेल्या नागरिकांच्या स्मरणात बांधण्यात आलेल्या स्मारकास अभिवादन करतील. सकाळी 11.00 वाजता किल्लारी येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी 12.45 वाजता किल्लारी येथून लातूर शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण करतील.

उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांचे दुपारी 1.15 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी 2.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 3.30 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर व धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या समवेत भूंकपाला 30 वर्षे आणि सद्यस्थिती याबाबत बैठक घेतील. दुपारी 4.45 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक संस्था यांच्या समवेत बैठक घेतील. सायंकाळी 5.45 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी यांच्या समवेत बैठकीला उपस्थित राहतील. सायंकाळी 6.30 वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथून सोलापूरकडे प्रयाण करतील.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा