मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन लातूर, दि.23 (विमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथील विमानतळावर आगमन झाले. लातूर, धाराशिव जिल्ह्यातील पीक परिस्थितीची आज ते पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आगमन झाले. याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांचे निवेदने स्वीकारली.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत