सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम लातूर, दि. २३ (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांनी दिलेल्या सूचनांनुसार लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज जमा केलेले नाहीत, त्यांनी आपले अर्ज तात्काळ ऑनलाईन भरून समितीकडे जमा करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी कळविण्यात आल्या आहेत, अशा अर्जदार व पालकांनी मूळ कागदपत्रांसह २८, २९ व ३० सप्टेंबर २०२६ आणि ०५ व ०६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी. दिलेल्या वेळेत त्रुटींची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांच्या प्रकरणांची नियमानुसार त्वरित तपासणी करून त्यांना शिबीरादरम्यानच ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले जाणार असल्याने, जात वैधता प्रमाणपत्राअभावी होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थी व पालकांनी या सेवा संकल्प अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत