Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम

सेवा संकल्प अभियानांतर्गत जात पडताळणी समितीची विशेष मोहीम लातूर, दि. २३ (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांनी दिलेल्या सूचनांनुसार लातूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात १२ वी विज्ञान शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात पडताळणी समितीकडे ऑनलाईन अर्ज जमा केलेले नाहीत, त्यांनी आपले अर्ज तात्काळ ऑनलाईन भरून समितीकडे जमा करावेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये त्रुटी कळविण्यात आल्या आहेत, अशा अर्जदार व पालकांनी मूळ कागदपत्रांसह २८, २९ व ३० सप्टेंबर २०२६ आणि ०५ व ०६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी. दिलेल्या वेळेत त्रुटींची पूर्तता क...

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर! पिकांचे सरसकट नुकसान; मदतही सरसकट देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद • शेतकऱ्यांना थेट मदत देण्यासाठी गतीने पावले उचलण्यास सुरुवात • संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार लातूर, दि. २३ (विमाका) : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून, येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून, राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याला लातूर येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा...

पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर !

Image
  पिकांचे सरसकट नुकसान ; मदतही सरसकट देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोसा येथे पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना थेट मदत देण्यासाठी गतीने पावले उचलण्यास सुरुवात संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही ; शासन पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहणार   लातूर, दि. २३ (विमाका) : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ ५० टक्के पाऊस झाला असून , येथील नदी-नाले व विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पावसाअभावी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याचे दिसत असून , राज्य शासनही शेतकऱ्यांना सरसकट मदत करेल. या संकटकाळात शेतकऱ्यांना एकटे न सोडता शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्यक ती सर्व मदत करेल , अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   पीक परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दौऱ्याला लातूर येथून सुरुवात झाली. यावेळी त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ आणि खरोस...

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस दुष्काळाच पहिली अधिसूचना लवकरच लातूर, दि. 23 (जिमाका) :   शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशयगांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचीमाहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणेउभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्रीफडणवीस यांचे आज (ता.23) सकाळी लातूर विमानतळावर आगमन झाले, यावेळी त्यांनी माध्यमांशीसंवाद साधला. दुष्काळाच्या संबंधाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावरयोग्य कार्यवाही सुरू आहे. तसेच दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत.सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे. सोबतचपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठीआवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबीं...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन लातूर, दि.23 (विमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर येथील विमानतळावर आगमन झाले. लातूर, धाराशिव जिल्ह्यातील पीक परिस्थितीची आज ते पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आगमन झाले. याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार बसवराज पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांचे निवेदने स्वीकारली.

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २२ : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांचे सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी १०.५५ वाजता ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. तसेच, सकाळी ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. **

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम लातूर, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवार, २३ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे सकाळी ९.५० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल. सकाळी १०.५५ वाजता ते निलंगा तालुक्यातील जाऊ येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. तसेच, सकाळी ११.३५ वाजता औसा तालुक्यातील खरोसा येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर धाराशिव जिल्ह्याकडे प्रयाण करतील. **

दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दिवाळी २०२६ निमित्त लातूर जिल्ह्यात तात्पुरत्या फटाका विक्री परवान्यासाठी २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २१ : दिवाळी २०२६ सणानिमित्त जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्री दुकाने सुरू करण्यासाठी परवान्याकरिता २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ‘एक्सप्लोसिव्ह रूल्स २००८’ मधील नियम ८४ नुसार सुरक्षा अटींच्या अधीन राहून तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार जिल्हादंडाधिकारी यांना असून यानुसार अर्जांची छाननी, स्थळ पाहणी आणि विविध परवानग्यांची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. अर्जदारांनी २८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सेतू सुविधामधून प्राप्त विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड अथवा विजेचे बिल यांसारखा रहिवास पुरावा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला, जागेच्या मालकीचा पुरावा किंवा भाडेपट्टा, तसेच जागा भाडेतत्त्वावर असल्यास जागामालकाचे संमतीपत्र, प्रस्तावित दुकानाच्या जागेचा नकाशा व लेआउट प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यानंतर १८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तहसीलदार व पोलीस विभागाकडून प्रत्यक्ष स्थळ ...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. २१ : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आला आहे. शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या योगदानाला अधिकृत ओळख मिळावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणार असून, कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीची मालकी हा निकष न ठेवता शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधुमक्षिकापालन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन यांसह विविध शेती व शेतीपूरक कामांमध्ये सहभागी महिलांचा...

'महाविस्तार एआय' ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर - सूर्यकांत लोखंडे ▪बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम

Image
'महाविस्तार एआय' ॲपमुळे कृषी विषयक माहिती आता एका क्लिकवर - सूर्यकांत लोखंडे ▪बोरफळ येथे माहिती व जनसंपर्क विभागाचा 'लोकसंवाद' उपक्रम लातूर, दि. २१ : राज्याच्या कृषि विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'महाविस्तार एआय' ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकर्यांना शेतीविषयी अचूक माहिती आणि मदत एकाच क्लिकवर मिळणार असल्याचे कृषि विभागाचे सूर्यकांत लोखंडे यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत औसा तालुक्यातील बोरफळ येथील चौकातला राजा गणेश मंडळाच्या सहकार्याने लोकसंवाद २०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे डॉ. ऋषिकेश खारोळकर, कौशल्य विकास अधिकारी गिरीश महामुनी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, विभागीय माहिती कार्यालयातील सहायक अधीक्षक अशोक माळगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पीक वाढीच्या टप्प्यानुसार पीक सल्ला, पीक प्रमाणित कार्यपद्धती, हवामानाचा अचूक अंदाज, खत मात्रा गणक, कीड - रोग ओळख व यावर उपाय, पिकांचे बाजारभाव, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा, गोदाम उपलब्...

'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत मुरुड येथे मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या 'लोकसंवाद२०२६' या उपक्रमांतर्गत #लातूर तालुक्यातील #मुरुड येथील महाराज गणेश मंडळ येथे नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा, उद्योग क्षेत्रातील संधी आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांनी खादी ग्रामोद्योग व उद्योग विभागांतर्गत मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि सवलतींची माहिती दिली. तसेच, मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ठोंबरे, आरोग्य मित्र धनंजय नवगिरे आणि गोविंद सुरवसे यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ​#गणेशोत्सव  ​#लोकसंवाद२०२६

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानाला लातूर जिल्ह्यात आनंदवाडी (गौर) येथून प्रारंभ

Image
 *माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम* लातूर, दि. १७ : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथून या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमात कृषि विभाग, जिल्हा खादी ग्रामोद्योग विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे, उपकृषी अधिकारी सुनील घारोळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, आनंदवाडी (गौर) येथील संयुक्त गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश संजय चामे, उपाध्यक्ष ग्यानदेव गोपाळ चामे, सचिव रमण ज्ञानोबा चामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. यामाध्यमातून मळणी यंत्रे, तेल घाणे यासारख्या शेतीशी नि...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्ज नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर अंतिम मुदत · पात्र विद्यार्थ्यांनी महा-आयटी पोर्टलवर अर्ज सादर करावेत लातूर, दि. १६: अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्जांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज महाआयटी पोर्टलवर सादर करावेत, असे आवाहन लातूर येथील समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत. सन २०१७ पासून सुरू असलेल्या या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना आणि अटी-शर्ती शासनाच्या स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर माहितीसाठी उपलब्ध आहे. शासकीय निर्णयातील सर्व अटी व शर्तींच्या अनुषंगाने, ज्या पात्र विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ मध...

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती

लातूर येथील मेस्को क्षेत्रीय कार्यालय लिपीक पदासाठी भरती लातूर दि. १६ (जिमाका): जिल्ह्यातील माजी सैनिक यांनी  लातूर मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथे एका माजी सैनिक लिपीक पदावर तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदासाठी उमेदवार हा माजी सैनिक असावा. माजी सैनिक लिपिकास प्राधान्य). उम्मेदवारांचे  वय हे माजी सैनिकासाठी ५८ वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी आणि संगणकीय ज्ञान एमएससीआयटी (MSCIT) उत्तीर्ण असावे. तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखन व मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान (लिहिणे व वाचणे) असणे गरजेचे आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा व शारीरिकदृष्ट्या सक्षम उम्मेदवारांची मेस्कोच्या नियमाप्रमाणे व मेस्कोच्या गरजेनुसार कार्य करण्याची तयारी असावी.    तरी या पदासाठी पात्र व इच्छूक माजी सैनिकांनी आपला अर्ज व सर्व मुळ कागदपत्रासह सोमवार, २१ सप्टेंबर,२०२६ रोजी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कागद पत्र जमा करुन नाव नोंदणी करावी , असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी आवाहन केले आहे. ...

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत 

सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वंयमयोजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जाती क वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन २०२६-२७ साठी सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सरू केलेली आहे. प्रति जिल्हा ६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  भोजन, निवास व निर्वाह भत्ता ४३ हजार रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता ३८ हजार रुपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक सलग्न असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.या योजनेतर्गत अर्ज करण्याकरीता विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र अ...

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्गातील उच्च विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा •       वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ  लातूर, दि. १६  : राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लातूर येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे व मुलांचे १०० विद्यार्थी क्षमतेचे प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांची भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य याची निःशुल्क व्यवस्था करण्यात येते. सन २०२६-२७ साठी रिक्त असलेल्या जागेवर वसतिगृह प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यास ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र,  तसेच जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत, ज्यामध्ये मुलांची १४ आणि मुलींची १२ वसतिगृहे समाविष्ट आहेत. यापैकी लातूर शहरात मुलांची ६ व मुलींची ४ वसतिगृहे असून औसा, निलंगा, उदगीर, देवणी आणि चाकूर येथे प्रत्येकी मुलांचे १ व मुलींचे १ वसतिगृह सुरू आहे. तसेच अहमदपूर येथे मुलांची २ व मुलींची २, रेणापूर येथे मुलांचे १ आणि जळकोट येथे मुलींचे १ वसतिगृह कार्यरत आहे. या सर्व शासकीय वसतिगृहांची सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाईन पद्धतीने सुरू असून, इच्छुक विद्यार्थी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या नवीन लिंकचा वापर करून आपले अर्ज भरू शकतात. जिल्ह्यात इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या, तसेच बिगर-व्यावसायिक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) हे प्रवेश अर्ज भरता येतील. तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यंतरीच्या (म...

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतचे लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर रोजी आयोजन

  ·          प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणांचा तडजोडीने होणार निपटारा लातूर, दि. १४ (जिमाका): राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी , तहसीलदार , उपविभागीय अधिकारी , उपजिल्हाधिकारी , अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित प्रलंबित असलेले विविध महसुली दावे व अपीले सामंजस्याने व कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लातूर जिल्ह्यात येत्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून तसेच त्यांच्या सामाजिक न्याय व शेतकरी कल्याणाच्या मूळ विचारांना स्मरून हे अभियान राज्यभरात राबविण्यात येत आहे. महसुली दाव्यांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर निकाल विरोधात लागलेले पक्षकार वरिष्ठ न्यायालयात अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात , ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर म...

भरती परीक्षा सुधारणांसाठी अभिप्राय, सूचना जिल्हास्तरीय विशेष कक्षात १८ सप्टेंबरपर्यंत सादर करता येणार

लातूर, दि. १४ (जिमाका) : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी कामाच्या अनुषंगाने ही समिती भेट देणार आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आस्थापना शाखा येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कामकाजासाठी खुला राहील. याठिकाणी नागरिक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष सादर करू शकतात. समितीच्या छत्रपती संभाजीनगर येथील भेटी दरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे समिती संवाद साधणार आहे. तसेच ज्या नागरिकांना प्रत्यक...

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद

भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्सचा २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यव्यापी संवाद • विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद • सूचना, अभिप्राय स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर विशेष कक्ष लातूर, दि. १२ (विमाका) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर येथे २१ सप्टेंबर २०२६ रोजी टास्क फोर्सचा संवाद दौरा होणार आहे. या भेटीदरम्यान विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संबंधित हितधारकांशी थेट संवाद साधून त्यांच्या सूचना, अडचणी व अभिप्राय जाणून घेतले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्र...