Posts

जिल्हयातील 408 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम स्थगित लातूर,दि.17:- राज्य निवडणूक आयोगाचे 17 मार्च 2020 यासोबत पाठविण्यात येत आहे. सदरील पत्रान्वये मा. राज्य निवडणूक आयोग यांनी करोना विषाणू(कोव्हिड-19)मुळे उदभवलेल्या गंभीर परिस्थीतीचया पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या सुरु असलेले सर्व कार्यक्रम दिनांक 17 मार्च 2020 रोजी ज्या टप्प्यावर आहेत त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहेत. त्या अनुषंगाने जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या लातूर जिल्हयातील 408 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगीत करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी कळविले आहे. त्याचप्रमाणे सन 2020 ते 2025 या कालावधीतील गठीत होणाऱ्या लातूर जिल्हयातील सर्व 785 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडतीव्दारे संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या उपस्थितीत नेमून देणेकरीता दिनांक 23 मार्च 2020 व 24 मार्च 2020 या तारखा निश्चीत करण्यात आल्या होत्या.सदरील आरक्षण हे सर्व संबंधीत ग्रामपंचा...
अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज 14 एप्रिल पर्यंत बंद लातूर,दि.17:- लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे सर्व संस्थामध्ये मोठया प्रमाणात जनसमुदाय एकत्र येतील अशा बैठका / कार्यक्रम/ चर्चासत्र / कार्यशाळा / संमेलन / परीषद इत्यादीचे आयोजन करु नये असे कळविले असल्यामुळे तसेच रुग्णालयामध्ये गर्दी होवून नोवेल कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू नये,खबरदारीचा उपाय म्हणुन    दि. 18 मार्च 2020 ते दि. 14 एप्रिल 2020 या कालावधीत अपंग प्रमाणपत्र, नोंदणी, तपासणी व वयाचे प्रमाणपत्राचे वितरण‍ शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत बंद राहतील.         तसेच अपंग व वयाचे प्रमाणपत्र वितरणाचे कामकाज अत्यावश्यक नसल्यामुळे बंद ठेवण्यात येत आहे.   यापूर्वी ज्या अपंग व्यक्तींना तपासणीची पुर्वनियुक्ती दिलेली आहे अशा अपंग व्यक्तींना प्राधान्याने पुर्ननियुक्ती देण्यात येईल्. त्यामुळे सर्व अपंग व्यक्तींनी वरील कालावधीत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत येण्याचे...
जिल्हयातील 12 प्रवासी/सहवासितांचे स्वॉब नमुने निगेटीव्ह लातूर,दि.17:- सद्यस्थितीत लातूर जिल्हयात आजतागायत “ कोरोना ” बाबत 17 प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले आहेत. त्यापैकी 12 प्रवाशी /सहवासितांचे अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. 5 प्रवाशी/सहवासितांचे स्वॅब तपासणी अहवाल येणार आहेत. “ कोरोना ” विषाणूचा संसर्ग बाबत सदृश्य लक्षणे असणारा एकही रुग्ण्‍ नाही. सद्य‍िस्थतीत लातूर जिल्हयात Isolation ward मध्ये कोरोना बाधित रुग्ण्‍ दाखल नाही. खबरदारी म्हणून दोन विदेशातून आलेल्या प्रवाशीचे स्वॉब घेण्यात आलेला आहे. “ कोरोना ” विषाणूचा संसर्ग बाबत साथीच्या आजावरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागामार्फत औषोधोपचार व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत व येत आहेत. तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी. महत्वाची सूचना :-कोरोना विषाणू संसर्ग झाल्याची शंका आली तर घाबरु नका, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, तुम्ही या विषाणूग्रस्त भागात प्रवास केला असेल आणि ताप खोकला आणि श्वास घ्यावयास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टराचा सल्ला घ्यावा...
सिरसल येथून जर्मनीकडे 16.5 टन द्राक्ष निर्यात लातूर,दि.17:- सहयाद्री ॲग्रो प्रोडयुसर कंपनी मार्फत अर्थमेड ॲग्रो एक्सपोर्ट औसा येथून द्राक्षाचे पहिले कंटेनर जर्मनीकडे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने कृषि उपसंचालक राजकुमार मोरे यांच्या हस्ते पूजन करुन पाठविण्यात आले.         जागतीक हवामानाच्या बदलामुळे द्राक्ष निर्यातीवर कोरोनामुळे चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. द्राक्षामुळे प्रतिकार शक्ती वाढविण्यासा मदत होत असल्यामुळे ग्राहाकाकडून आरोग्यासाठी द्राक्ष खरेदी केली जातील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी सिरसल येथील शेतकरी श्रीमती प्रभावती शिवाजी धानुरे यांचे 16.5 टन द्राक्ष निर्यात करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. ***
वाहनांची जागीच मोडीत काढून जाहिर लिलावाद्वारे विक्री          लातूर,दि.17- प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर यांचे फिरते पथकामार्फत एस.टी.डेपो, छत्रपती शिवाजी माहाराज चौक, लातूर येथे अटकावून ठेवण्यात आलेल्या एकूण 5 वाहने कार थकित, बेवारस   वाहने, जाहिर लिलावाद्वारे विक्री करावयाच आहेत, सर्व वाहने जागीच मोडीत काढून देण्यात येतील.           वाहन क्रमांक वाहनाचा प्रकाराची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर पहावयास मिळेल, पात्र व्यक्ती संस्था यांनी प्रादेशिक परिवहन कर्यालय येथे जाऊन वाहनाचे निरीक्षण करुन रु.20,000/- रुपये रक्कमेचा राष्ट्रीय बँकेचा धनाकर्ष (regional Transport officer latur) यांच्या नावे स्वत:च्या फोटो ओळखपत्रासह खटला शाखेत   दि.3 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करावेत.              जाहिर लिलाव दि 18 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. किमान किंमत न आल्यास किंवा इत...
प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता मुदत वाढ       लातूर,दि.17:- महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याकरिता इच्छुक संस्थांकडून व्यवस्थापनांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी दि. 1 जानेवारी 2020 ते 28 फेब्रुवारी 2020 असा होता. तो दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आलेला आहे.         https://vti.dvet.gov.in या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थालयाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज भरता येईल. मान्यता प्रक्रीया पुर्ण करणे बाबतची माहिती मंडळाच्या माहिती पुस्तीकेमध्ये देण्यात आली आहे. युजर मॅन्युअल (USER MANUAL)व माहिती पुस्तीका मंडळाच्या ( www.msbve.gov.in ) या संकेतस्थळावर उपलब्ध्‍   आहे.   परिपूर्ण   अर्जावरच पुढील कार्यवाही करण्यात येईल तसेच संस्थेला सर्व प्रकारच्या शुल्काचा ऑनलाईन भरणा करण्यात येईल.         अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रश...
शासनाच्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे कर्तव्य पार पाडावे                                           -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत *जिल्हा नियंत्रण कक्षासाठी संपर्क क्रमांक 02382-246803       लातूर,दि.16:- जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सुचने प्रमाणे आपले कर्तव्य पार पाडून नागरी सुविधा उपलब्ध्‍ करुन दयाव्‍यात अशा सुचना जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिल्या.         जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित कोरोना विषाणू प्रादूर्भाव बैठकीत केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे   मुख्य कार्यकारी आधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अतिरिक्त पेालीसअधिक्षक हिम्मत जाधव, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उपविभागीय अधिकारी, व तहसि...