पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती
पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तींची बचाव / सुटका करण्यासाठी तीन पथकांची नियुक्ती *रेणापूर व लातूर तालुक्यातील पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुखरुप सुटका लातूर दि.28-(जि.मा.का) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लातूर यांच्याकडून पुरात अडकेल्या व्यक्तींची सुटका/ बचाव करण्यासाठी स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली असल्यचे जिल्हा प्रशासनने कळविले आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. या मध्ये पथक क्रमांक 1 गावाचे नाव सारसा, देवळा, ता. रेणापूर. पथक प्रमुख व संपर्क क्र. श्री. कासले 9975719929, पथक क्र. 2 गावाचे नाव घणसरगाव ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री राठोड 8459482287, पथक क्र. 3 गावाचे नाव डिगोळ देशमुख ता. रेणापूर पथक प्रमुख व संपर्क श्री शिंदे 9975143101 / 9011032433 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मौजे डिगोळ देशमुख ता. रेणापूर जि. लातूर येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुट...