Posts

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एचआयव्ही/ एड्स जनजागृती करीता आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धा

Image
  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त   एचआयव्ही/ एड्स जनजागृती करीता आयोजित करण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धा   लातूर,दि.26 (जिमाका) या कार्यालयामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव INDIA@ 75 या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा एडृस प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर मार्फत श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर येथे व संयुक्त विद्यमाने जिल्हयातील रेड रिबन क्लब (RRC) असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एचआयव्ही / एड्स, रक्तदान व क्षयरोग या विषयी जनजागृती करीता प्रश्नमंजूषा स्पर्धा दि. 25 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.दुशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. प्रश्नमंजूषा स्पर्धेत श्रीमती. सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातूर, राजर्षी शाहु महाविद्यालय, जयक्रांती महाविद्यालय, आझाद महाविद्यालय,औसा, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर,शहिद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी, दयानंद कला महाविद्यालय, लातूर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील विद्या...

मौजे मांजरी, सामनगाव, खोपेगाव, हरंगुळ (खु), पाखरसांगवी, कासारगाव, कोळपा, बसवंतपूर, चिंचोलीराव, खाडगाव, धनेगाव येथे भव्य कायदेविशयक शिबीर संपन्न

  मौजे मांजरी, सामनगाव, खोपेगाव, हरंगुळ (खु), पाखरसांगवी, कासारगाव, कोळपा, बसवंतपूर, चिंचोलीराव, खाडगाव, धनेगाव येथे भव्य कायदेविशयक शिबीर संपन्न   लातूर,दि.26 (जिमाका) मा. सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देषानुसार दि. 02 ऑक्टोबर 2021 ते दि. 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविशयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.   मौजे मांजरी, सामनगाव, खोपेगाव, हरंगुळ (खु), पाखरसांगवी, कासारगाव, कोळपा, बसवंतपूर, चिंचोलीराव, खाडगाव, धनेगाव येथे आज भव्य कायदेविषयक शिबीर पार पडले.             या कार्यक्रमास मांजरी येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणुन गावच्या सरपंच सौ. चव्हाण मंगल विजय हया होत्या.   प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल अॅड. अजय कलशेट्टी यांनी जेष्ठ नागरिक व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन उपस्थित जनतेला केले. पॅनल अॅड. सुरेष सलगरे यांनी क...

या "फळाचा" नाद केला...अन समृद्धी आली...!!

Image
या " फळाचा" नाद केला...अन समृद्धी आली...!!     लातूर जिल्हा म्हणजे पक्क्या बेसाल्टवर बसलेला डेक्कन प्ल्याटूवरचा सगळ्यात टणक भाग... बोली भाषेत मांजरा खडक म्हणतो त्याच मांजरा नदीच्या खोऱ्याचा हा भाग...अशी भौगोलिक ओळख असलेल्या या भागात निसर्गाला पूरक असलेल्या अनेक फळापैकी एक फळ म्हणजे " सिताफळ " येतं ... रानफळातलं सगळ्यात गोड आणि आरोग्यदायी फळ म्हणून ओळखलं जातं.. याचे शास्त्रीय नाव चेरीमोया असे असून याची मूळ उत्पती दक्षिण अमेरिकेतील अंडस पर्वत राजी इथली... उष्ण कटीबंधीय फळ आहे. हे सगळं सांगण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... फार काळ तुमची उत्कंठता न ताणता, मूळ विषयावर येतो..!! जानवळ येथील 'येलाले'   हे प्रयोगशील शेतकरी, ते खरे द्राक्षबागायतदार पण काही वर्षांपूर्वी युरोप खंडात पाठवलेल्या द्राक्षात पेस्टीसाईडचा तांत्रिक दोष दाखवून ते द्राक्ष समुद्रात फेकून दिले... त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. त्यात 'येलाले' यांचाही माल होता..   त्यामुळे त्यांनाही लाखोचा फटका बसला. त्यातच त्यांनी द्राक्ष बाग मोडली. या लाख...

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त मौजे वासनगाव,टाकळी (ब),महापूर, चिंचोलीराव वाडी, नादगाव व जेवळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न

  आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त मौजे वासनगाव,टाकळी (ब),महापूर, चिंचोलीराव वाडी, नादगाव व जेवळी येथे भव्य कायदेविषयक शिबीर संपन्न   लातूर दि.25(जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालय व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. 2 ऑक्टोबर, ते 14 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हयामध्ये गावोगावी कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याचे ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मौजे वासनगाव, टाकळी, महापूर, चिंचोलीराव वाडी, नांदगाव व जेवळी येथे जावुन तेथील ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वासनगाव येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावचे सरपंच पुष्पाताई थोरमोटे या होत्या. प्रमुख वक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक आशिष कुटवाडे यांनी विधी सेवा प्राधिकरण या विषयावर सविस्तर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. विधी स्वंयसेवक राहुल पंढरी चेबळे यांनी लोकअदालत या विषयावर मार्गदर्शन केले. आग्रवाल ...

दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना सर्वदूर पोहोचविण्यासाठी संवेदना लातूर संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे निर्देश --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

Image
  दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना सर्वदूर पोहोचविण्यासाठी   संवेदना लातूर संकेतस्थळाचे अद्यावतीकरण करण्याचे निर्देश -- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.   §   अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा. §   दिव्यांग सहाय्यक भत्ता मिळण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा. §   निरामय आरोग्य विमा योजनेसाठी जिल्ह्यातील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना प्रिमीयम जमा करण्याचा निर्णय §   ग्रामीण भागातील दिव्यांगांसाठी वैद्यकीय तपासणी व उपचार शिबीराचे आय़ोजन करावे §   जि.प.ने जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी रोजगाराच्या दृष्टीने विविध विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन   लातूर दि.25(जिमाका):- दिव्यांगाच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात यासाठी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. यामध्ये निरामय कार्ड वितरण, प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन, ग्रामीण भागात दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी, संवेदना लातूर दिव्यांगांकरिता असणाऱ्या या वेबसाईटचे अद्याय...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील जिल्हयातील सहा जणांचे यश लातूर जिल्हयातील अनेक युवकांना प्रेरणा देणारे --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.

Image
  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील जिल्हयातील सहा जणांचे यश लातूर जिल्हयातील अनेक युवकांना प्रेरणा देणारे --जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. §   *केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील गुणवंताचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव*   लातूर,दि.22(जिमाका):-   केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील युवक, युवती यांनी उज्वल यश संपादन केले   आहे. हे सहा जणांचे यश म्हणजे जिल्हयातील अनेक युवकांना प्रेरणा देणारे तसेच   लातूर जिल्ह्याचा गौरव वाढविणारे असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात युपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंताच्या सत्कार दरम्यान हे गौरवोद्गार काढले. जिल्ह्यातील युवक, युवतींना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून या सर्वांचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आणि जिल्हा माहिती कार्यालय, लातूर फेसबुक लाईव्ह आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. ...

वाचन प्रेरणा दिना निमित्त ग्रंथ प्रदर्शन

Image
                               वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन लातूर दि.22(जिमाका):- माजी राष्ट्रपती भारतरत्न स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्म दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधुन वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. ग्रंथालयीन ग्रंथांची ओळख व्हावी या उद्देशाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन दि. 20 ऑक्टोबर 2021   ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत करण्यात आले.   या ग्रंथ प्रदर्शनामध्ये डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले त्यांच्यावरती लिहिलेले तसेच अनेक नामवंत लेखकांच्या नामवंत ग्रंथाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे जिल्हा माहिती अधिकारी श्री.युवराज पाटील यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व फित कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ओ. सुनिल जगभारे, कार्यालयाचे श्री....