अहमदपूर येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
अहमदपूर येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा लातूर , दि. 20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता , मार्गदर्शन केंद्र आणि अहमदपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयो जन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात लातूर , पुणे जिल्ह्यातील सहा आस्थपाना , उद्योजक यांनी एकूण 385 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि., पुणे येथील एचआर मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रा. लि...