राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण वंचितांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य राजर्षि शाहू महाराजांनी केले -खासदार सुधाकर शृंगारे
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण वंचितांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य राजर्षि शाहू महाराजांनी केले - खासदार सुधाकर शृंगारे लातूर , दि . 26 (जिमाका) : राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित घटकाला आरक्षण देवून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या समाज घटकासाठी काम करण्यासाठी पाठबळ दिले. त्यामुळे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेतील योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले. राजर्षि छत्रपती शाहू महाराज चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी खासदार श्री. शृंगारे बोलत होते. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार तिरतसिंह रावत , औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे , लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख , मध्यप्रदेश पर्यटन विकास महामंडळा...