जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी औजारांसाठी अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी औजारांसाठी अर्ज करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. 11 (जिमाका) : जिल्हा परिषद, लातूर कृषि विभाग अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकरी लाभार्थ्यांना कडबाकुट्टी सयंत्र (Chaffcutter), रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र (Broad Bed Furrow Planter (BBF) व स्लरी फिल्टर (Slurry Filter) खरेदी करण्यासाठी डीबीटी तत्वावर अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र शेतकरी लाभार्थ्यांकडून अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्याबाबत मागणी असल्यामुळे कृषीयंत्र या घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हा परिषद लातूरच्या कृषि विभागाने सन २०२५-२६ या वर्षातील सेस निधीमधून शेतकऱ्यांसाठी कडबाकुट्टी, रुंद सरी वरंबा पेरणी यंत्र आणि स्लरी फिल्टर औजारांसाठी जिल्हा परिषद सेस फंडातून तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा शेतीमधील खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी २९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सु...