लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित
लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित § उदगीर शहरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी वाहतूक मार्गात बदल लातूर दि.28 ( जिमाका ):- लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर आज प्रादेशिक परिवहनच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. सदरची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणचे गजानन निरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, वाहन निरीक्षक अशोक जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आदि संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे नवीन दर पुढीलप्रमाणे :- मारुती व्हॅन (25 कि.मी. अथवा दोन तासाकरिता) भाडे रुपये 520/- प्रती कि.मी. रुपये 13 प...