तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना येत्या 2 मार्च रोजी मोफत ऑनलाईन नोंदणी
तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी जिल्हास्तरीय समितीची
स्थापना
येत्या 2 मार्च रोजी मोफत ऑनलाईन नोंदणी
लातूर दि.28(जिमाका):- राज्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच तक्रारी संदर्भात तक्रार निवारण
समितीची स्थापना शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. त्यानुसार लातूर
जिल्ह्यामध्ये तृतीयपंथी यांच्या तक्रार निवारण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण
करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी विविध शासकीय योजनांचा लाभ
घेण्यासाठी त्यांची नोंदणी https://transgender.dosje.gov.in/ या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाकडून बुधवार दिनांक 02
मार्च 2022 रोजी मुलांचे शासकीय वसतिगृह,सोमनाथपूर ता.उदगीर जि. लातूर येथे https://transgender.dosje.gov.in/
या संकेतस्थळावर मोफत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कँम्प आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी सर्व कागदपत्रासह
कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी.तसेच ओळखपत्र व
प्रमाणपत्र नोंदणी संदर्भात या अधिक माहितीसाठी या कार्यालयातील घुगे संदेश (समाज
कल्याण निरीक्षक) (9405446219) व पांढरे शिवाजी (कनिष्ठ लिपीक) (9823768188)
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लातूर समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवकांत
चिकुर्ते यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment