पोलीस स्टेशन रेणापूर येथे बेवारस वाहनाचा 15 फेब्रुवारी रोजी लिलाव

 

पोलीस स्टेशन रेणापूर येथे बेवारस वाहनाचा

15 फेब्रुवारी रोजी लिलाव

 

        लातूर,दि.10(जिमाका)- पोलीस स्टेशन, रेणापूर येथे एकुण 49 बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव मंगळवार दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी  सकाळी 11.00 वाजता पोलीस स्टेशन  रेणापूर आवारात करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट पोलीस स्टेशन  रेणापूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

          पोलीस स्टेशन  रेणापूर येथील 49 बेवारस वाहनामध्ये दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनाचा समावेश आहे. वाहनाचा लिलाव करण्यासाठी नमुद वाहनाचे मालकी हक्क सिध्द करण्यासाठी आज पावेतो कागदोपत्री पत्रव्यवहार करुन कोणीही मालकी हक्क सिध्द करु न शकल्याने नमुद वाहनाचे किंमती (मुल्यांकन) बाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर यांना पत्रव्यवहार करुन त्यांचेकडून बेवारस वाहनाचे मुल्यांकन करुन किंमतीची लेखी माहिती प्राप्त झाली असून लिलावाची परवानगी घेण्यात आली आहे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.

 

                                                        0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन