पशुधनात भरीव वाढ--सुनील केदार मंत्री, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि क्रीडा व युवक कल्याण
पशुधनात भरीव वाढ
राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय
विकास आणि क्रीडा व युवक कल्याण विभागांतर्गत भरीव कामगिरी केली. मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य
योजना, गीर जातीच्या वळूंची आयात, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, सर्व जिल्ह्यांमध्ये
खेलो इंडिया सेंटर, खेळाडूंना अर्थसाहाय्य आदी निर्णयांमुळे कृषी अर्थचक्राला व क्रीडाक्षेत्राला
झळाली मिळाली आहे.
सुनील
केदार
मंत्री,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि
क्रीडा
व युवक कल्याण
पशुधन ही राष्ट्रीय संपत्ती आहे, पशुधनाची जोपासना ही काळाची
गरज आहे. उत्पादनशील पाळीव प्राण्यांची उत्पादनक्षमता किंवा उपयुक्तता वाढवण्याच्या
दृष्टिकोनातून त्यांचे प्रजनन (पैदास) पालनपोषण करणे याकरिता पशुसंवर्धन विभाग सातत्याने
प्रयत्न करत आहे. पशुप्रजनन, त्यांचे संगोपन, पोषण आणि रोगराईपासून संरक्षण तसेच स्थानिक
समस्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त शास्त्रीय दृष्टिकोनातून पशुपालन करण्याकरिता प्राधन्य
देण्यात येत आहे.
पशुधनवाढीला चालना
उच्च वंशावळीची निर्मिती : राज्यात शेतकर्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग
विनिश्चित वीर्यमात्रा वापर करून उच्च आनुवंशिकतेच्या कालवडी/पाड्यांची निर्मिती करण्यात
येणार असून, यामध्ये राज्यात आता 90 टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती
होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त 81 रुपयांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्याने घेतला आहे.
प्रयोगशाळेची निर्मिती : एव्हीएनएन्फ्लूएन्झा, ब्रुसेलोसिस,
रेबीज इत्यादी आणि सीसीएचएफसारख्या उदयोन्मुख व प्राण्यांपासून मानवास होणार्या इतर
आजारांचे (नेेपेींळल) निदान करण्यासाठी बीएसएल-खखख ची सुविधा आवश्यक आहे. म्हणून पुणे
येथे टर्नकी बेरिसवरील बायो सेफ्टी लेव्हल -2 आणि बायो सेफ्टी लेव्हल-3 प्रयोगशाळेच्या
निर्मितीचा प्रकल्प आरकेव्हीवाय अंतर्गत हाती घेण्यात आला आहे.
गीर जातीच्या वळूंची आयात : राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन
विकास मंडळ नागपूर यांच्यामार्फत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ यांच्या सहकार्याने ब्राझीलमधून
शुद्ध गीर वंशाचे 10 वळू खरेदी करण्यात येणार असून, केंद्र शासनामार्फत 1000 वीर्यमात्रा
व 50 भ्रूणचा पुरवठा राज्यास केला जाणार आहे. ज्या वळूच्या मातेचे दूध 10 हजार किलो
प्रतिवेतपेक्षा जास्त आहे, असे गीर वळू आयात करण्यात येणार आहेत. गीर वळूपासून वीर्य
रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीच्या पैदासीद्वारे राज्यात
दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना
राज्यातील दुर्गम, डोंगर, आदिवासी बहुल भागामध्ये पशुरुग्णांना
पशुवैद्यकीय सेवा, पशुपालकांच्या शेतकर्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी, मुख्यमंत्री
पशुस्वास्थ योजनेंतर्गत राज्यातील 349 ग्रामीण तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक
स्थापन करण्यात येणार आहे. स्थापन करावयाच्या फिरत्या पशुचिकित्सा पथकांपैकी पहिल्या
टप्प्यात 81 पथके स्थापन करण्याचा निर्णय झाला असून सद्य:स्थितीत क्षेत्रीय स्तरावर
73 पशुचिकित्सा पथके कार्यरत झालेली आहेत.
इतर महत्त्वाचे निर्णय
लाभार्थ्यांना उस्मानाबादी/संगमनेरी
अथवा स्थानिक वातावरणात तग धरतील अशा प्रजातींच्या पैदासक्षम 10 शेळ्या व 1 बोकड अथवा
माडग्याळ प्रजातीच्या किंवा दख्खणी व अन्य स्थानिक प्रजातींच्या 10 मेंढ्या अधिक 1
नर मेंढा असा गट वाटप करण्यात येत आहे.
पशुसंवर्धनाशी निगडित स्वयंरोजगाराच्या उद्देशाने राबवण्यात
येणार्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन या शासन
अनुदानित विविध योजनांमध्ये ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून, संगणकीय
प्रणालीद्वारे निवड करण्यात आली.
कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची ‘टर्न की’ बेसिसवर उभारणी पूर्ण.
शासकीय दूध योजनेंतर्गत अतिरिक्त होणारे एकूण 137.93 लक्ष लीटर दुधाचे भुकटीमध्ये रूपांतरण
व भुकटीची विक्री करून 207.14 कोटी रुपये महसूल प्राप्त. महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठात कोविड चाचणीसाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय
क्रीडा विद्यापीठ
भारतामधील
अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे, क्रीडा कामगिरीसाठी
आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे, प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे, क्रीडाक्षेत्रात
रोजगार निर्मिती करणे, क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करून
देणे. आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपरिक देशी खेळांचा विकास करणे, समाजातील
दुर्बल घटकांना क्रीडानैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करून देणे, खेळाडू,
क्रीडा तज्ज्ञ, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इत्यादींच्या
सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे, अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करून उत्तम
दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक तयार करण्यासाठी देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ
महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे. तसेच खेळाडूंचा दर्जा उंचावण्याकरिता गेल्या दोन
वर्षात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी
सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 36 खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय मागील
काही वर्षात आंतरराष्ट्रीय संस्थांनी राष्ट्राच्या विकासाची काही नवीन मानके निश्चित
केली आहेत व त्या निकषांच्या आधारे राष्ट्राची प्रगती मोजली जाते. त्यापैकी महत्त्वाचा
निकष म्हणजे मानवी विकास निर्देशांक (ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स), या मानव विकास निर्देशांकास
उंची देण्यासाठी राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र सुरू करण्याचा
महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
खेळाडूंना
आर्थिक साहाय्य
टोक्यो ऑलिम्पिक
2020 साठी राज्यातील निवड झालेल्या 10 खेळाडूंना प्रशिक्षण व सरावासाठी प्रत्येकी
50 लाख रुपयेप्रमाणे एकूण 5 कोटी रुपये इतके आर्थिक साहाय्य प्रदान. आंतरराष्ट्रीय
क्रीडा स्पर्धांपूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य करणारे देशातील एकमेव राज्य.
आशियाई
महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2022: आंतरराष्ट्रीय व आशिया खंडातील पहिल्या 12 देशांमध्ये
ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, त्यामुळे या स्पर्धा आयोजनास विशेष महत्त्व आहे.
ही स्पर्धा 22 जानेवारी 2022 ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत महाराष्ट्रात मुंबई,
नवी मुंबई व पुणे येथे आयोजित होत असल्याने या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरानुसार
सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.
जागतिक
चषक 17 वर्षांखालील मुलींची फूटबॉल स्पर्धा : जागतिक (ऋखऋअ) तसेच भारतीय फूटबॉल संघटनेच्या
संयुक्त विद्यमाने व राज्य शासनाच्या सहकार्याने 17 वर्षांखालील मुलींच्या फीफा वर्ल्डकप
फूटबॉल स्पर्धांचे आयोजन. यातील अंतिम व उपांत्य फेरीचे सामने राज्यात नवी मुंबई येथे
होणार आहेत.
खेलो
इंडिया युथ गेम्स 2020 : तिसर्या खेलो इंडिया युथ गेम्स 2020 स्पर्धेत राज्याने
78 सुवर्ण, 77 रौप्य व 102 कांस्य अशी एकूण 257 पदके मिळवून पदक तालिकेत प्रथम स्थान
संपादन केले. पदक विजेत्या 319 खेळाडूंना 295 कोटी रुपयांची रोख रकमेची बक्षिसे देऊन
गौरवण्यात आले.
शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा
मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य
क्रीडा दिव्यांग पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा संघटक/कार्यकर्ता पुरस्कार, शिवछत्रपती
राज्य क्रीडा साहसी क्रीडा पुरस्कार वितरण गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे 22 फेब्रुवारी,
2020 रोजी भव्य स्वरूपात संपन्न. तीन वर्षाच्या कालावधीनंतर सरकार स्थापनेबरोबर भव्य
स्वरूपात हे पुरस्कार देण्यात आले.
गो-गर्ल-गो
मोहीम : मुलींमध्ये तंदुरुस्तीबाबत व आहार आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे,
तसेच खेळांकडे आकर्षित करून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याच्या
प्रक्रियेस चालना. राज्यात इयत्ता पहिली ते बारावीमधील 6 ते 18 वयोगटातील मुलींसाठी
गो-गर्ल-गो मोहिमेचा शुभारंभ.
1.67
कोटी शिष्यवृत्ती वितरित
राष्ट्रीय
शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेल्या व प्रावीण्यप्राप्त
अशा खेळाडूंना 1.67 कोटी रुपये शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली.
शब्दांकन
: राजू धोत्रे,
विभागीय
संपर्क अधिकारी
Comments
Post a Comment