राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवा,डोस पासून एकही पालक वंचित राहू नये याची दक्षता घ्या - राजमंत्री संजय बनसोडे

 

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवा,डोस पासून एकही बालक वंचित राहू नये याची दक्षता घ्या

                                       - राजमंत्री संजय बनसोडे

लातूर दि.27 ( जिमाका ):- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवून एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संजय बनसोडे यांनी केले.

लातूर येथील स्त्री रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेप्रसंगी ते बोलत होते. देश पोलिओ मुक्त होत आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून जनजागृती करावी. बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाते,  त्याचप्रमाणे नागरिकांनी  कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा आणि बूस्टर डोस घ्यावा. व कोविड-19 पासून बचाव होणार आहे. तसेच येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा द्यावी.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील शंभर टक्के पोलिओ लसीद्वारे संरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे, असेही राजमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिकेचे मनपा आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त श्रीमती सिंदिकर,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, निवासी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे,  बालरोगतज्ज्ञ डॉ.धुमाळ, डॉ. भागडीया, डॉ. लापसे तसेच स्त्री रुग्णालयातील अधिसेविका, परिचारिका आदिंची यावेळी उपस्थिती होती.

                                                0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु