उदगीर व जळकोट तालुक्यातील 25 गावातील अंतर्गत रस्त्यासाठी 5 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर

 

उदगीर व जळकोट तालुक्यातील 25 गावातील अंतर्गत

रस्त्यासाठी  5 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर

-         राज्यमंत्री संजय बनसोडे

        लातूर,दि.17(जिमाका):-उदगीर व जळकोट तालुक्यातील 25 गावातील अंतर्गत रस्ते विकासासाठी 5 कोटी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येणार आहेत. गावाच्या अंतर्गत सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते विकासामुळे शेतकऱ्यांना दळणवळण व वाहतुकीने शेतकऱ्यांना फायदा होणार असून हे रस्ते शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहेत अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

         यामध्ये उदगीर तालुक्यातील नागलगाव - 20 लाख, हंडरगुळी - 20 लाख, हाळी - 20 लाख, वाढवणा खु. - 20 लाख, हेर - 20 लाख, रावणगाव - 20 लाख, दावणगाव - 30 लाख, डोंगर शेळकी - 20 लाख, मादलापूर - 20 लाख, मलकापूर - 20 लाख, मोघा - 20 लाख, सोमनाथपूर - 20 लाख, नळगीर – 25 लाख, तोगरी - 20 लाख, देवर्जन - 20 लाख या ग्रामपंचायतीचा तसेच जळकोट तालुक्यातील डोंगरगाव - 20 लाख, केकत सिंदगी - 20 लाख, धामनगाव - 20 लाख, जगळपूर - 20 लाख, कुनकी - 20 लाख, वांझरवाडा - 20 लाख, माळहिप्परगा - 20 लाख, मंगरूळ - 20 लाख, रावनकुळा - 20 लाख, अतनूर - 20 लाख या ग्रामपंचायतीचा समावेश असून मनरेगा अंतर्गत 05 कोटी 15 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मनरेगांतर्गत तालुकास्तरावर कामनिहाय दिलेल्या आर्थिक मर्यादेत या कामांना तांत्रिक व प्रशासकिय मान्यता तालुकास्तरावरच देण्यात येणार आहे.

          महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ही ग्रामीण रस्त्याची कामे होणार आहेत. उदगीर व जळकोट शहराचा विकास ज्या प्रमाणे होत आहे त्याच प्रमाणे ग्रामीण भागाचाही विकास करण्यात येणार असून मागील दोन दिवसापुर्वी 46 कोटी च्या पाणी पुरवठयाच्या योजना मंजूर केल्या आहेत. त्याच अनुषंगाने या दोन तालुक्यातील 25 गावातील अंतर्गत रस्त्यासाठी 05 कोटी 15 लाखाचा निधी मंजूर केला आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

 

                                                         0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा