अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य संस्थाचलकांनी अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत
अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य
संस्थाचलकांनी
अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत
लातूर,दि.15(जिमाका):- धार्मिक
अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना
अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद
शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन
2021-22 साठी संस्थाचालकांनी या योजनेअंतर्गतचे प्रस्ताव शासन निर्णयाप्रमाणे विहित
नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय,बार्शी
रोड, लातूर या कार्यालयात दिनांक 18 फेब्रुवारी 2022 दुपारी 5.00 वाजे पर्यंत सादर
करावेत असे जिल्हा नियोजन अधिकारी लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अल्पसंख्यांक
विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 7 ऑक्टोबर 2015 अन्वये राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक
विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था
व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
या योजना राबविण्याबाबत अल्पसंख्यांक विकास विभाग, परिपत्रक दि. 8 फेब्रुवारी 2022
अन्वये कळविण्यात आले आहे. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत याची
संबंधितांनी नोंद घ्यावी असे ही पत्रकात नमुद केले आहे.
00000
Comments
Post a Comment