तुर पिक विमा धारक शेतकऱ्यांना 25टक्के आगाऊ रक्कम मंजूर -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

तुर पिक विमा धारक शेतकऱ्यांना

25टक्के आगाऊ रक्कम मंजूर

                                     -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.

 

            लातूर दि.23(जिमाका):- खरीप हंगाम 2021 प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील 86 हजार 249 हे.  क्षेत्रावर  तूर पिकाची पेरणी केलेली होती. त्यापैकी 60856.71 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर विमा संरक्षण घेण्यात आले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी योजनेतील Mid Season Adversity या जोखीमे अंतर्गत तूर पीक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के विमा नुकसान भरपाई आगाऊ स्वरूपात देण्याबाबतची  अधिसूचना निर्गमित करुन आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यातील एकूण 60 महसूल मंडळांमध्ये सर्व तुर पिक विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम  म्हणून 39.17 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे ती रक्कम समयोजित करून 1 लाख 39 हजार 965 शेतकऱ्यांना 20.48 कोटी वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                  0000      

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा