अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प
अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी
येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प
लातूर दि.25(जिमाका):-अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियमन
2011 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिनांक 5 ऑगस्ट, 2011 पासून लागू करण्यात आला
आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देणे
हा आहे. त्याअंतर्गत अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी घेणे आवश्कय आहे.
सोमवार, दिनांक 28 फेब्रुवारी,
2022 रोजी 11-00 ते 2-00 या वेळेत कृष्णा एजन्सीज, हत्ते नगर, लातूर येथे परवाना व
नोंदणीबाबत विशेष कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे असे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न
व औषध प्रशासन म.राज्य, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment