सायलेज बेलर मशीन युनिटसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत
सायलेज बेलर मशीन युनिटसाठी
28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावेत
लातूर,दि.16(जिमाका):- राष्ट्रीय पशुधन अभियान 2021-22 (सर्व साधारण प्रवर्ग) अंतर्गत (एनएलएम) मुरघास
निर्मिती करिता लातूर जिल्ह्यामध्ये 01 (एक) सायलेज (मुरघास) बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी
दिनांक 17 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत लाभार्थी निवड प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात
येत आहेत.
या अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि)
पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध् करुन देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ लातूर जिल्ह्यातील
सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दूध उत्पादक संस्था / संघ, शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था,
स्वंयसहाय्यता बचत गट व गोशाळा / पांजरपोळ / गोरक्षण संस्था यांना अर्ज भरता येईल.
या योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्य क्रमाने निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील
एकाच संस्थेला योजनेचा लाभ दयावयाचा आहे.
या योजनेसाठी एका युनिटसाठी रु. 20 लक्ष खर्चापैकी
50 टक्के रक्कम रु. 10 लक्ष केंद्र शासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरित 50 टक्के रक्कम
रु. 10 लक्ष संस्थेने स्वत:खर्च करावयाचे आहे. योजनेच्या लाभासाठी रु. 10 लक्ष निधी
खर्च करण्याची आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे. संस्थेने / लाभार्थ्यांने मशनरीची (सायलेज
बेलर, किमान 2 में. टन प्रति तास क्षमतेचे हेवी डयुटी कडबाकुटी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली,
वजन काटा, हार्वेस्टर, मशीन शेड) खरेदी केल्यानंतर पडताळणी करुन निधी संस्थेच्या /
लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त,
लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
0000
Comments
Post a Comment