लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये स्टार मानांकन योजना

 

लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये

स्टार मानांकन योजना

 

          लातूर दि.28(जिमाका):- लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्टार मानांकन योजना प्रोत्साहितपणे राबविण्यासाठी  तसेच शासनाने पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारीत "माझी वंसुधरा अभियान-2.0’’ हे अभियान जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये राबविण्यासाठी  जिल्हा  प्रशासनाने तयारी केली असून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबत आज सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, नगर अभियंता यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायतीमध्ये स्टार मानांकन योजना राबविण्यांबाबत तातडीचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. दिले आहेत.  

   या  बैठकीत लातूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा / नगरपंचायती मध्ये स्टार मानांकन योजना राबविण्याबाबत आढावा घेवून  याबाबत सर्वांना मार्गदर्शन केले. स्टार मानांकन योजनामध्ये मालमत्ता कर व पाणीपट्टीचा (ऑनलाईन पध्‍दतीने) भरणा करणे, ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करणे, विजेची  बचत करणारी उपकरणे जसे LED Bulbs, Tubes इ. वापर करणे, छतावरील पावसाच्या पाण्याचे  पुर्नरभरण करणे (ROOF WATER HARVESTING), पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करणे, SOLAR LIGHT / SOLAR WATER HEATER चा वापर करणे व  नळांना वॉटर मिटर बसविणे या बाबींवर चर्चा करून त्यांच्या नागरी क्षेत्रामध्ये या बाबींचा विचार करून किती मानांकनाचे स्टार मानांकन वापरून योजना राबविण्याची आहे. याबाबत सर्व मुख्याधिकारी यांना आराखडा तयार करून यांची तात्काळ अमंलबजावणी करणेबाबत निर्देश देण्यांत आले. या गोष्टी केल्यामुळे नागरीकांना करसवलतीमुळे प्रत्यक्ष  लाभ मिळणार आहे व अप्रत्यक्षरित्या शहरांना लाभ होणार आहे. सर्व मुख्याधिकारी यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करून या योजनेमध्ये  नागरिकांना सहभागी करून सदरील संकल्‍पना / योजना यशस्वीरित्या  त्वरित  प्रत्यक्षात अंमलात आणावी, असे निर्देश दिले. 

       जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रत्येक शहराचा / जिल्ह्याचा  एक चेहरा असतो / एक ओळख असते. या अभियानातून स्टार मानांकन योजनेसह आपल्याला आपल्या शहराची व जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करावयाची असल्याने शासनाकडुन राबविण्यांत येणारी माझी वंसुधरा अभियान-2.0’ अभियानाची सुध्दा अमंलबजावणी यशस्‍वीरित्या  राबविण्यात येणार असल्याने मानांकन योजनेस उत्स्फूर्तपणे सर्व नागरी क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा सहआयुक्त सतिश शिवणे, नपाप्र विभाग व जिल्ह्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतीचे सर्व मुख्याधिकारी व नगर अभियंते उपस्थित होते.

                                              0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु